मंगरूळ:
येथील पिरसाहेब महिला  बचत गटाच्या अध्यक्षा  प्रियंका रुपेश घोजगे यांच्या पुढाकारातून आंबळे गावातील ग्रामस्थांना श्रीक्षेत्र अक्कलकोट व श्रीक्षेत्र तुळजापूर  दर्शन घडवून आणले जाणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, तरूण आणि महिलांना या यात्रेचा लाभ घेता येणार आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या घोजगे कुटूबियांची सूनबाई असलेल्या प्रियंका घोजगे या ही तितक्याच तळमळीने सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत.
घोजगे यांच्या पुढाकारातून आंबळे येथील ग्रामस्थांसाठी श्री क्षेत्र अक्कलकोट व श्री क्षेत्र तुळजापूर , देवस्थान या ठिकाणी जाण्यासाठी बसचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी  ग्रामपंचायत सदस्य श्री घोटीराम घोलप , श्री नंदकुमार पानसरे माजी चेअरमन श्री ज्ञानेश्वर भांगरे ,श्री पांडुरंग आंभोरे , श्री विलास भालेराव , श्री पंढरीनाथ हांडे ,मा सरपंच श्री राजु शेलार , श्री विठ्ठल घोजगे , आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे ,
अमोल अंभोरे ,माऊली अंभोरे  ,संतोश खेंगले  ,शंकर अंभोरे ,सूर्यकात भांगरे  पप्पू पानसरे,गणेश भांगरे ,लक्ष्मण आंभोरे ,ज्ञानदेव अंभोरे लालु घोलप,कैलास भांगरे ,करण अंभोरे ,तन्मय भांगेरे ,नवनाथ पानसरे,दिप्तेश पानसरे,संकेत पानसरे,आदित्य भांगरे,मानव पानसरे,संतोष देशमुख,महेंद्र मापारी,तानाजी पवार,मंगेश हांडे, प्रतीक पानसरे,संतोष भांगरे,तुकाराम बाबर,मदन आंभोरे,राजू आंभोरे,आरुष पानसरे,गिरीश पानसरे,रुद्राक्ष पानसरे,कैलास शेलार,श्रावण भांगरे,प्रकाश पानसरे,संदीप घोजगे,नीरज मिश्रा उपस्थित होते.
  आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रूपेश घोजगे व पिरसाहेब महिला बचत गटाच्या  अध्यक्षा प्रियंका घोजगे म्हणाल्या,” यात्रेचे महत्व आणि पुण्य अनन्यसाधारण आहे. देव, देवी, सद्गुरू यांच्या चरणी प्रत्येकाची श्रद्धा आहे. ही श्रद्धास्थाने आपली शक्ती आहे. या तीर्थपीठांच्या दर्शनाने नवी उमेद मिळतेच. शिवाय दु:ख क्लेश दूर होतो. आंबळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील माता माऊली, बंधू यांची सेवा करण्याचा हा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!