टाकवे बुद्रुक:
शिरे ता.मावळ येथे श्री विठ्ठल रखुमाई व हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन व श्री भैरवनाथ महाराज उत्सव संपन्न होत आहे.
मावळभूषण वैकुंठवासी ह.भ.प. किसन म. मुक्ताजी शेटे यांच्या प्रेरणेने व कृपाशिर्वादाने सालाबादप्रमाणे शिरे, ता. मावळ येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव व श्री विठ्ठल रखुमाई, हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम होणार आहे.
  समाजातील दानशूर तालुक्यातील भाविक बंधु भगिनी व स्टोन क्रशर उद्योजक, ग्रुप ग्रामपंचायत आंबळे व समस्त ग्रामस्थ मंडळी, शिरे- शेटेवाडी यांच्या सहकार्याने मिती मार्गशिर्ष कृ. १० शके १९४४ रविवार दि. १८/१२/२०२२ रोजी संपन्न होत आहे.
शनिवार दि. १७ / १२ / २०२२ते  रविवार दि. १८/१२/२०२२ कार्यक्रम होणार आहेआ.पुण्याहवाचन व गणपती पुजन,होमहवन,मुर्ती व कलश मिरवणुक, मुर्तीचा जलनिवास (पुण्याहवाचन),धान्यनिवास,मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन पुर्णाहुती   आदि  धार्मिक कार्यक्रम होणार आहे .श्री भैरवनाथ महाराज उत्सव  होईल. पंचक्रोशीतील  आंबळे, निगडे. मंगरूळ, कदमवाडी, घोलपवाडी, पवळेवाडी  टाकवे बुद्रुक तील भजन होईल.
वैराग्यमुर्ती ह.भ.प.शंकर महाराज मराठे भामचंद्र निवासी, श्रीरंग  बारणे  खासदार, सुनिल शंकरराव शेळके आमदार, संजय  भेगडे माजी राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
समस्त ग्रामस्थ मंडळी शिरे, शेटेवाडी कार्यक्रमाचे आयोजक आहे.

error: Content is protected !!