तळेगाव दाभाडे:
येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात  संत श्री  संताजी महाराज जगनाडे यांची  पुण्यतिथी   विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन  उत्साहाने साजरी करण्यात आली. 
     मंदिरात पहाटे काकड आरती भजन अभिषेक पुजा  तसेच  संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन  सामाजिक कार्यकर्ते  संजय  कसाबी  आणी बाळा  कसाबी  यांचे हस्ते करण्यात आली.यावेळी तेली समाजाचे ज्येष्ठ  कार्यकर्ते  किसनराव  खोंड , प्रकाश वालझाडे ,अभिजित  कसाबी  ,अनिल  जगनाडे  ,सुधाकर बारमुख,  मोहन  खळदे,अरुण कसाबी  प्रदिप टेकवडे ,शैलेश  मखामले, तुषार  जगनाडे  यांचे सह महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
   विठ्ठल मंदिराचे प्रमुख ह.भ. प .ज्ञानेश्वर महाराज दाभाडे  आणि  पुरोहित अतुलकाका देशपांडे  यांनी  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न केले.कसाबी  परिवाराकडून  महाआरती महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!