कामशेत:
वारकरी संप्रदाय व श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाजसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य गोशाळा उद्घाटन सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ताजे, मावळ येथे हा सोहळा होणार आहे. ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (गोसेवक) व ह.भ.प. गुलाब महाराज खालकर (भागवताचार्य)
यांच्या मार्गदर्शनाखाली व गोमातेच्या कृपाशिर्वादाने संगीत श्रीमद भागवत कथा आयोजित केली आहे.
तसेच गोरक्षणार्थ भव्य गोशाळा शेडचे उद्घाटन करण्याचे योजिले आहे. त्यानिमित्त ह.भ.प. तुषार महाराज दळवी (भाजे, मावळ) यांची संगीत भागवत कथा होईल. गुरुवार दि. १२/०१/२०२३ ते सोमवार दि. १६/०१/२०२३ रोजी  स्थळ :- मु.पो. ताजे, ता. मावळ, जि. पुणे येथे असणार आहे.
गुरुवार दि. १२/०१/२०१३ ते दि. सोमवार १६/०१/२०१३ रोजी पर्यंत * सायं. ५ ते ६ वा. – हरिपाठ (विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ व बाल भजनी मंडळ ताजे)  सायं. ६ ते ९ वा. – संगित श्रीमद् भागवत कथा होईल.
पहिला दिवस भागवत महात्म्य, गोकर्णउपाख्यान, परिक्षीतीजन्म, विदुर कपिलमुनी आख्यान, दत्तात्रय आख्यान
दुसरा दिवस शिवसती कथा, धृवाख्यान, जडभरत अजामेळ आख्यान, प्रल्हाद आख्यान, गजेंद्र मोक्ष,
तिसरा दिवस समुद्र मंथन, वामनआवतार, मत्स्यनारायण व मनु अवतार, अंबारीष दुर्वास कथा,
श्रीरामजन्म, सिता स्वयंवर, राम वनवास, युध्द चौथा दिवस खटवांगराया ययाती देवयानी आख्यान, यदुवंश, वसुदेव देवकी विवाह, कृष्णजन्म, राक्षसउध्दार
पाचवा दिवस गोकुळ लिला, वेणुगित, दहीहंडी, अकुर आगमन, सुदामा आख्यान, सुभद्रा हरण, अवधुत दत्तात्र यदुसंवाद, कलीरहस्य, तक्षक कश्यप आख्यान होईल.
मंगळवार दि. १७/०१/२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प. भागवताचार्य पोपट महाराज कासारखेडकर (जळगाव)महाराष्ट्र वारकरी भुषण यांचे सुश्राव्य किर्तनरूपी सेवा होईल.
विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, सुदर्शन तरुण मंडळ, सर्व महिला बचत गट, सर्व क्रिकेट क्लब, ताजे, मावळ हे या सोहळ्याचे व्यवस्थापक आहे.

You missed

error: Content is protected !!