टाकवे बुद्रुक :
आंदर मावळ मधील  माळेगाव बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम २९ व्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने काल्याची किर्तनरूपी सेवा किर्तनकार हभप. किशोर महाराज बांगर चिखलगाव खेड  यांची संपन्न झाली. या वेळी किर्तनकार ह. भ.प. किशोर महाराज बांगर
यांचा सत्कार टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या हस्ते व  माळेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला.
तसेच माळेगाव बुद्रुक येथील  गावातील नागरिकांना सप्ताह निमित्त येणाऱ्या भावी भक्तांसाठी जेवण बनवण्यासाठी लागणारे व  पंगतीसाठी लागणारे साहित्य टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास नाना असवले यांच्या वतीने देण्यात आले त्यानिमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने माजी उपसरपंच रोहिदास असवले यांचा सत्कार करण्यात आला.
आयोजक समस्त ग्रामस्थ माळेगाव बुद्रुक हे होते.
कार्यक्रमाचे नियोजन पोलीस पाटील अंकुश ठाकर, अर्जुन आलम, सुरेश आलम जयदास ठाकर, बाळासाहेब आलम,  बजरंग ठाकर, पुजारी एकनाथ महाराज जगताप, मृदंग मनी नवनाथ ठाकर,  ज्ञानेश्वर महाराज आलम यांनी केले .
तर कार्यक्रमाच्या वेळी पाहुणे म्हणून तुकाराम कोद्रे,चिकू वायकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वाऊड संतोष मोकाशी, माजी चेअरमन विकास असवले, संजू जगताप, भाजपा टाकवे शहर अध्यक्ष दत्तात्रय असवले, माजी अध्यक्ष काळूराम घोजगे, मुन्नावर आत्तार,चेतन लोंढे, काशिनाथ जांभुळकर,साहेबराव आंबेकर, संतोष कोंडे सोमनाथ असवले उपस्थित होते.

error: Content is protected !!