तळेगाव दाभाडे:आमदार सुनिल शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित MPL 2025 मावळ प्रिमियर लीग२२/०१/२०२५ ते २६/०१/२०२५या कालावधीत होणार प्रीमियर लीगच्या मैदानाची स्पर्धेचे मुख्य आयोजक  मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी केली.
मागील काही वर्षांपासून भागवत यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत असते. अंत्यत देखण्या आणि नीटनेटके आयोजन यासाठी ही स्पर्धा प्रसिद्ध आहे.मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन व प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन इंदोरी यांच्या पुढाकाराने ही प्रीमियर लीग होणार आहे.
कडजाई माता क्रीडांगण इंदोरी, मावळ होणा-या या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. प्रथम क्रमांकास १,००,०००/- चषक,द्वितिय क्रमांकास ७१,०००/- चषक,तृतिय क्रमांकास ५१,०००/- चषक,चतुर्थ क्रमांकास ५१,०००/- चषक अशी बक्षीसे आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण असणार आहे.  उत्कृष्ट फलंदाजाला २१,००० रु व चषक,उत्कृष्ट गोलंदाजीला २१,०००रु व चषक,मालिकावीराला ३१,००० रु व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहे.
आयोजक प्रशांत भागवत म्हणाले, “तरुणाई मध्ये क्रिकेट प्रीमियर लीगचे मोठे आकर्षण आहे.या तरुणांना व्यासपीठ व्हावे यासाठी ही स्पर्धा आहे. केवळ जिंकण्यासाठी स्पर्धा नाही. तर सरावासाठी आणि नेतृत्व गुणांसह संघभावना वाढीसाठी ही स्पर्धा आहे.

error: Content is protected !!