तळेगाव दाभाडे, : समाज हिताकरिता उदार अंतकरणाने सदैव भरभरून मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व सनदी लेखापाल (सीए) चंद्रकांत माणिकलाल शहा अर्थात सी. एम. शहा (वय.९३) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या तळमळीने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कै. ला. सी. एम. शहा यांच्या योगदानातून ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने पवनानगर येथे ला. शांता माणेक पवना ज्यूनिअर कॉलेजची उभारणी झाली. त्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य म्हणून तसेच ला. शांता माणेक पवना ज्युनिअर कॉलेजच्या ज्येष्ठ सदस्य पदाची धुरा सांभाळली.
लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या नेत्ररोग शिबिरांचा भरीव वाटा उचलीत त्यांनी मुंबई येथील लायन्स क्लब ऑफ कलिना आणि जुहूच्या माध्यमातून आजवरचे सर्व नेत्र शिबिरे यशस्वीरित्या पार पाडली. मावळ परिसरातील नेत्र रुग्णांकरिता नेत्र शिबिरांचे जनक आणि दृष्टीकिरण ते ठरले.
उद्योजक दिपक शहा, शैलेश शहा आणि नूमविप्र मंडळाचे ज्येष्ठ संचालक महेश शहा यांचे ते ज्येष्ठ चुलत बंधू होत. सी. एम. शहा हे व्यवसायाने सीए होते. सांताक्रुज येथील सी. माणिकलाल अँड कंपनी या सुप्रसिद्ध सीए फर्मचे ते मुख्य संचालक होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम