
वडगाव मावळ: पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस व मावळ तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माॅ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पायल देवकर व मावळ तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूजा खराडे यांनी दिली.
३ जानेवारी २०२५ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत या स्पर्धा होणार आहे.निबंध लेखनासाठी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरू राजमाता जिजाऊ, स्वराज्य निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे योगदान,महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान हे विषय आहे.
तर वक्तृत्व स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले यांचे आरोग्य आणि दुष्काळ विषय कार्य, महात्मा फुले यांच्या जीवनकार्यातील सावित्रीबाईचे महत्व,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील राजमाता जिजाऊंचा प्रभाव,आधुनिक स्त्री जडणघडणीमध्ये राजमाता जिजाऊंचा प्रभाव,आधुनिक स्त्री स्वावलंबी की परावलंबी हे विषय आहे.जास्तीत युवतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन देवकर व खराडे यांनी केले.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार


