तळेगाव दाभाडे: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये नवलाख उंबरे शाळेतील कोमल कैलास मते हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये  द्वितीय क्रमांक पटकावला.
सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.निबंध लेखन स्पर्धेमध्ये शाळेतील श्रद्धा गणेश पडवळ आणि संस्कृती सोमनाथ गायकवाड या दोघींनी देखील सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निकम  उपस्थित होत्या.
तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फाऊंडेशन चे  दिनेश चौधरी, अमर चव्हाण, नरेंद्र उमाळे उपस्थित होते. या विद्यार्थिनींना सुरेखा मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री किल्लारीकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य आणि समस्त ग्रामस्थांनी या यशस्वी मुलींचे कौतुक केले.

error: Content is protected !!