कार्ला: नाणे मावळातील अनेक गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेकी मागण्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो. कार्ला गावात दळवी आळीला देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
गावतील प्रत्येक घरातील महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिला गावातील मंदिर किंवा पारावर एकत्र आल्या. यामध्ये फुगड्या, फेर पारंपारिक गाणी, उखाणे अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद महिला लुटला. गावातील राजकीय व्यक्तीपासुन ते सर्व थरातील व्यक्तीच्या बोलण्या चालण्याचा नकला, विविध कौशल्य या महिलांनी छसादर केली. याशिवाय उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची अशा अनेक
स्पर्धांनी रंगत आणली. या खेळात गावातील लहान मुलींपासुन ते वृध्द महिलेपर्यंत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.महिला मंडळाच्या वतीने एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविण्यात आले. त्या मुलांकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी गेल्या.
नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम पार पडला.पसंतीनंतर लग्नाची तयारी, ढोल ताशांच्या गजरात नवरा नवरीची वरात काढण्यात आली. त्यामध्ये महिला मनसोक्त नाचतात, गातात. ही वरात तास दीड तास चालली. त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा पार पडला. जमलेल्या सर्व मंडळींना भोजन देण्यात आले. या सोहळ्यामध्ये अनेक महिला रोजच्या संसारातील सुख-दुःख विसरून सहभागी झाल्या होत्या.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन