कार्ला:
ढोल ताशांचा गजर, बॕन्डचा तालावर वाजत-गाजत नाचत भक्तिभावाने मिरवणूक काढुन “गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”अशी विनवनी करत गणेशभक्तानीं मंगलमय वातावरणात या वर्षी आलेल्या सहा दिवसांच्या गणपती व गौरींना भावपूर्ण निरोप दिला.
कार्ला परिसरातील मळवली,भाजे,पाटण,बोरज, देवले,वेहेरगाव,दहिवली,शिलाटणा,वाकसई देवघर,टाकवे, बोरज,सदापूर या ग्रामीण भागातील घरोघरी बसलेले गणराय हे बहुतांशी गौरी विर्सजनाबरोबर त्यांना निरोप दिला जातो.
कार्ला गावाबरोबर अनेक भागात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाखाली पूर्ण गावाचा एक गणपती असतो कार्ला गावातील मारुती मंदिरात भैरवनाथ तरुण मंडळच्या गावातील या गणरायाला सुध्दा गावातील घरोघरी बसलेल्या गणपती व गौराईबरोबर विर्सजन केले.ह्या मिरवणूकीची सुरवात ढोल ताशांच्या गजरात कार्ला मारूती मंदिरापासुन सुरवात होऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढून इंद्रायणी नदीच्या घाटावर गौरी गणपतीचे विर्सजन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.शिस्तबद्ध व शांततेत संध्याकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक संपली.
यावेळी लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ,सहायक निरिक्षक प्रंशात आवारे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन