कामशेत : बेडसे येथील तिखेवस्तीतील बापलेक गणपती विसर्जन करताना पाण्यात बुडाले. रात्री उशिरा वडिलांचा व मुलाचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला. पवन मावळात गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते. याच रीतीने संजय धोंडू शिर्के व अदित्य संजय शिर्के आपल्या कुटूबियांसमवेत गणरायाच्या विसर्जनासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची दुदैवी घटन घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या परिवारासह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी पोलीस पथक पोहचले होते. तर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा ,आपदा मित्र मावळ,मावळ आप्पती व्यवस्थापनच्या टीमने पाण्यात बुडालेल्या बापलेकांचा शोध घेतला. यात वडिलांचा मृतदेह सापडला.काही वेळ शोध केल्यावर मुलाचाही मृतदेह सापडला..टीम मधील निलेश गराडे ,रमेश कुंभार ,शत्रुघ्न रासनकर,ओंकार कालेकर ,संतोष दहिभाते ,शुभम काकडे यांच्यासह अन्य जणांनी शोधकार्य केले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन
[