पवनानगर ता.११- रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड च्या ब्राम्हणोली गाव घेतले दत्तक, सामाजिक संस्थेच्या मदतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहे 

ग्रामस्थांच्या पुढाकारने व रोटरीच्या नियमाने समाजसभेची स्थापना करण्यात आली आहे तसेच रोटरी इंटरनॅशनलच्या मान्यतेचे बाम्हणोली गावाला आर. सी. सी. प्रमाणपत्र  प्रदान करण्यात आले.

गावाच्या शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण, शुध्द पाणी इ. विषयीच्या गरजांची मांडणी गावाच्या वतीने समाजसभा कमिटीच्या मार्फत करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी  रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय देवरे,श्रीकांत पाटणकर, मिलिंद बिवलकर, विजय पुराणिक रमाकांत जाधव, अमेय पासलकर, सतिश कुलकर्णी, अभय मायदेवहे  रोटरी क्लब चे कमिटी सदस्य उपस्थित होते 

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय देवरे म्हणाले की, गावतील शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल त्यासाठी गावाचे योगदान देखील महत्वाचे आहे 

आर. सी. सी. व रोटरी क्लब यांच्या कार्यपद्धती व नियम याबाबत मार्गदर्शन केले. यांनी ग्रामस्थ व आर. सी.सी कमिटी सदस्यांची भूमिका, कर्तव्ये, श्रमदान, आर्थिक सहभाग इ. बाबत सविस्तर माहिती दिली.

रोटरी क्लब बरोबर असलेली सहयोगी संस्था –  शिव विद्या प्रतिष्ठान यांचे प्रमुख शिल्पा कशेळकर व संतोष वंजारी यांनी गाव विकासासाठी सर्वांनी एकीने  पुढे यावे तसेच युवक व महिलांनी नेतृत्व घ्यावे असे सांगितले.

यावेळी समाजसभा कमिटी अध्यक्ष योगेश काळे, सचिव अंकुश काळे, सुनिल काळे, शंकर काळे, महिला प्रतिनिधी कविता काळे, माजी सरपंच मारूती काळे,  विद्यमान उपसरपंच बाळासाहेब काळे, शहाजी काळे, निवृत्ती काळे, माजी चेअरमन गणपत काळे, माजी चेअरमन मधुकर काळे, लक्ष्मण काळे, ग्रा.पं. कर्मचारी माऊली काळे, जि.प. शाळा मुख्याध्यापक  संजय ठाकर,माजी उपसरपंच नवनाथ काळे, अनंता ताकदुंदे, पोलिस पाटील तानाजी काळे, भाऊ दळवी, तुकाराम काळे, ज्ञानेश्वर पवार, तसेच गावातील सर्व पदाधिकारी, युवक, महिला बचतगट सदस्य, रोटरी प्रकल्प लाभार्थीं व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात रोटरीच्या सहकार्याने व लोकसहभागातून गाव विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला.

error: Content is protected !!