वकिलांसाठी ई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
पिंपरी:मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय – पुणे, नेहरूनगर न्यायालय – पिंपरी तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वकिलांसाठीई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम पिंपरीतील नेहरूनगर न्यायालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एस. एस. चव्हाण, एस. एन. गवळी, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ई-फायलिंग व संगणकीय प्रशिक्षक ॲड. अतिश लांडगे, ॲड. लालचंद ओसवाल यांनी केले.
‘काळानुरूप बदलून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे!’ असे मत ई-फायलिंगबद्दल बोलताना न्यायाधीश एस. एन. गवळी साहेबांनी केले. ‘या शिबिराचा लाभ सर्व ज्युनिअर आणि सीनिअर वकिलांनी घ्यावा!’ असे आवाहन एस. एन. चव्हाण यांनी केले.
ॲड. अतिश लांडगे आणि ॲड. लालचंद ओसवाल यांनी https://filing.ecourts.gov.in/
या संकेत स्थळावरून ई-फायलिंग करावे असे नमूद करून वकिलांच्या नोंदणीपासून ते दावा/तक्रार दाखल कशी करायची त्याचबरोबर जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करण्यापासून त्यामध्ये इतर न्यायालयीन रोजच्या रोज चालणारे कामकाज कसे करायचे याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर पेपरलेस न्यायालयिन कामकाज करण्यासाठी वकिलांना यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले ई न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळांची माहिती मान्यवरांच्या मार्फत देण्यात आली.
न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळे खालील प्रमाणे
या सारखेच नवनवीन मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्याची ग्वाही अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली.
या कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक वकिलांनी सहभाग नोंदवला. सर्वांच्या अल्पोपाहार आणि भोजनाची व्यवस्था तसेच कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. मानसी उदासी, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. विवेक राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ॲड. धनंजय कोकणे यांनी केले; तर आभार ॲड. उमेश खंदारे यांनी मानले.