तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशोक दादाभाऊ दाभाडे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.आपल्या तब्येतीच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांच्याकडे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा 2023 मध्ये घेतली होती. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तळेगाव शहरांमधून महायुतीचा उमेदवाराला चांगल्या प्रकारे मताधिक्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मिळवून दिलं होतं.
दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये कार सेवकांचा सन्मान, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी तळेगाव शहरातील पक्षाच्या सर्व मोर्चा आघाड्याच्या नियुक्त करणे, तळेगाव मध्ये मतदार वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच तळेगावातील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आदी उपक्रम सर्व सहकाऱ्यांच्या समावेत पक्ष वाढीसाठी यशस्वीरित्या पार पाडले. या सर्व गोष्टी होत असताना त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे स्वखुशीने जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
दाभडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याची चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा आणि त्यापाठोपाठ येणा-या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.