नूतन अभियांत्रिकी मध्ये कौशल्य विकास दिन साजरा
तळेगाव दाभाडे:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकीच्या “नूतन इनक्युबेशन सेंटर” अंर्तगत कौशल्य विकास दिन नुकताच साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना फक्त अभ्यासी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता विविध तांत्रिक कौशल्य देखील आत्मसात करून स्वतःचा विकास करावा,अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक समूहासोबत काम करून औदयोगिक भेटी द्याव्यात.
स्वतःला विकसित करून भारत सरकारच्या स्कील इंडिया योजनेअंतर्गत युवकांनी उद्योग संबधित कौशल्य प्रशिक्षण घ्यावे, आपल्या शहराचा होणारा विकास त्याचबरोबर आपण स्वतःमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित करून उद्योग क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख कशी निर्माण केली पाहिजे या अनुषंगाने यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या स्टार्टअप वर या प्रसंगी प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रोजेक्टला पारितोषिक देण्यात आले . या स्पर्धेमध्ये फॉरेस्ट स्ट्रीट कंन्सल्टंसी च्या मार्केटिंग व्यवस्थापक धनश्री भोगे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. प्रा. डॉ. मदागोंडा बिरादार,अमन पनिया यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
संस्थचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, विश्वस्त रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले. इनक्युबेशन सेंटरचे सीईओ प्रा. मुजाहिद शेख आणि प्रा. नीलिमा गाडगे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन