येलवाडीगाव, देहू येथे कायदेविषयक मोफत शिबिर संपन्न
पिंपरी:
एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेविषयक शिबिर येलवाडीगाव, देहू येथे पार पडले.
यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
येलवाडी गावाच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी उत्सुकता होती. शिबिरात त्यांचे कायदेविषियक प्रश्न आणि शंकांचे निरसन झाल्यामुळे ते खुश होते.
याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. शंकर घंगाळे तसेच एस.एन.बी.पी विधी विद्यालयाचे शिक्षक स्वप्निल जाधव, विजयदीप मुंजनकर, येलवाडीगावचे माजी सरपंच नितीन ताटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते; तसेच या उपक्रमात विशाल मानकर, प्रशांत मोरे, मिलिंदराजे भोसले, सुबोध भोसले, किशोर सुतार, सोमनाथ आमले, प्रमोद काले, विशाल गभाले, प्रसाद लोंढे, स्वप्निल गांधिले या विधीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.