पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

पिंपरी: 

“विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नीतिविना गती गेली, 

गतिविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले..!!” असे सामाजिक प्रबोधन करून भारतात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालय, नेहरूनगर, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करीत त्रिवार अभिवादन करण्यात आले. 

यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. अमित गायकवाड, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. सर्वेश निकम आणि इतर वकील बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!