गुढीपाडव्यानिमित इनरव्हील क्लब ऑफ तळेगावची बाईक रॅली
पाणी वाचवा ..अन्न वाचवा
तळेगाव दाभाडे( प्रतिनिधी सुरेश शिंदे ) :
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पाणी वाचवा, अन्न वाचवा आणि कर्करोग निदान जनागृतीसाठी भव्य वूमन बाईक रॅली काढण्यात आली. क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात यांच्या संकल्पनेतून रॅलीचे आयोजन करताना प्रकल्प प्रमुख डॉ दीपाली भंडारी आणि रश्मी थोरात यांनी जबाबदारी घेतली.
रॅलीमध्ये तळेगावातील विविध कला व सांस्कृतिक मंडळातील १२० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. नऊवारी साडी, नथ, पारंपरिक दागिने घालून विविध घोषणा देत रॅली यशस्वी केली. इनरव्हील क्लब तर्फे सर्वांना जरीकाठाचे केशरी फेटे बांधण्यात आले.
संध्याकाळी ६ वाजता इनरव्हील क्लब हॉल पासून स्टेशन चौक, नगरपालिका, लिंब फाट्यापर्यंत दिमाखात जाऊन भंडारी हॉस्पिटल येथे थंडगार सरबत देऊन या रॅलीची सांगता झाली. डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट स्लोगन अशी बक्षिसे देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
चार्टर प्रेसिडेंट अल्भा पारेख तसेच पास्ट प्रेसिडेंटस् शर्मिला शहा, नीता देशपांडे वैशाली जामखेडकर, ट्रेजरर भाग्यश्री काळेबाग, आयएसओ वैभवी कारके क्लबच्या माजी पदाधिकारी आणि सदस्या या वेळी उपस्थित होत्या.
प्रेसिडेंट संध्या थोरात आणि प्रकल्प प्रमुख डॉ दीपाली भंडारी यांनी अन्न व पाणी यांचे महत्त्व विषद करून त्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच वाढत्या कर्करोगाच्या आजाराला वेळीच तपासणी करून पायबंद घालण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन