वडगाव मावळ: 

कळकराई करांच्या नशिबी असलेली पायपीट थांबणार आहे. कळकराई मोग्रज या रस्त्याला वनविभागाने हिरवा कंदील दिल्याने कळकराईकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.गुढीपाडव्याला ही गोड बातमी मिळाल्याने कळकराईकरांचा पाडवा गोड झाला आहे.

अनेक वर्ष केलेल्याअथक प्रयत्नांना यश आले आहे. वन विभागाने हा प्रस्ताव मंजूर केल्याने मराठी नूतन वर्षाच्या मूर्तावर गावक-यांनी वनविभागाचे आभार मानले. 

महाराष्ट्र शासन, वन विभाग ,उपवनसंरक्षक, अलिबाग.

वन परिक्षेत्र अधिकारी कर्जत पूर्व यांनी सहाय्यक वनसंरक्षक, पनवेल यांच्यामार्फत अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारीत नियम 2012 मधील कलम 3(2) चे अधीन  राहून हा आदेश दिला आहे.

तालुका मावळ येथील कळकराई नवीन जोडरस्ता बांधणे (कळकराई – मोग्रज) करिता मौजे – मोग्रज, तालुका- कर्जत, जिल्हा- रायगड, येथील राखीव क्षेत्र हे मोग्रज ग्रामपंचायत हद्दीत येत आहे. 

सदर कळकराई हे मोग्रज आदिवासीवाडी रस्त्याकरिता लागणाऱ्या वनक्षेत्राचे परिवर्तन करण्याकरता मागणी करणारा दावा मंजूर करणेसाठीचा प्रस्ताव शिफारसी सह या कार्यालयात सादर केला होता. तो 8 एप्रिल 2024 रोजी मंजूर झाला असल्याचे गावक-यांनी सांगितले.

आमदार सुनील  शेळके यांच्या प्रयत्नामधून कळकराई – मोग्रज या जोड रस्त्यासाठी भरघोस निधीची  तरतूद करून दिली आहे.

 सदरचा रस्ता वनविभाग परवानगी मिळण्यास  उपवनसंरक्षक राहुल पाटील कर्जत RFO चव्हाण ,पुणे बांधकाम विभाग  पाटील , वडगाव अभियंता दराडे, खोत, वनपाल लांघी यांचाही वाटा असल्याचे गावक-यांनी सांगितले.गावक-यांनी सबंधित अधिका-यांचा कार्यालयात जाऊन सत्कार केले.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनात हे काम मार्गी लागले.माजी सदस्य  भरत साबळे ,विद्यमान सदस्य  सचिन  तळपे, समाजिक कार्यकर्ते सूर्यकांत तळपे,चंद्रकांत कावळे,सखाराम  कावळे,गावातील तरुण मंडळ आणि  ग्रामस्थ यांनी पाठपुरावा केला.

error: Content is protected !!