लोणावळा:
शहरात कचरा संकलन करणारा ठेकेदार शासनाने व नगरपरिषदने करारात नमूद अटी/शर्ती चा भंग करून खोटी कागदपत्रे सादर करून बिले घेत आहे. याबाबत वारंवार पत्र, मेल व अधिकारी यांना प्रत्यक्षात निदर्शनास दाखऊन देखील करारात नमूद दंड वा ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आक्षेप मनसेचे नेते संदीप पोटफोडे यांनी घेतला आहे.
पोटफोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नगरपरिषदेचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालीत असल्याची तक्रार केली आहे.पोटफोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  डोळ्यावर पट्टी बांधून नगरपरिषद ठेकेदारास बिल अदा करून पाठीशी घालत आहे. भ्रष्ट लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी व ठेकेदाराने नगरपरिषदची फसवणुक केल्या प्रकरणी त्यावर गुन्हा दाखल करून कायमचा काळ्या यादीत टाकण्याची मागणी घेऊन नगरपरिषद प्रशासन विरोधात मुख्याधिकारी यांच्या दालनात दि.१३/०३/२०२४ रोजी सकाळी १० पासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
लोनावळेकर नागरिकांच्या पैश्याची लूट थांबविण्यासाठी नागरिकांनी देखिल मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मी (संदीप लक्ष्मण पोटफोडे) आपल्या माध्यमातून करत आहे.

error: Content is protected !!