वडगाव मावळ:
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष पदी सुदुंबरे येथील उत्तम मारूती गाडे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांची नियुक्ती केली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी माजीमंत्री मदन बाफना,पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, युवकचे  तालुकाध्यक्ष विशाल वहिले, शंकर मोढवे  व  अन्य मान्यवर उपस्थित होते.
उत्तम गाडे हे श्रीक्षेत्र सुदुंबरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते.गाडे विविध सामजिक संस्था आणि संघटनांशी निगडित असून कुशल संघटक आहे.उत्तम भाऊ गाडे युवा मंचाच्या मार्फत  विविध उपक्रम राबविणार त्यांचा भर असतो.
उत्तम गाडे म्हणाले,”आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कष्ट करणार आहे.ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर पक्षाचे काम वाढविण्याचा प्रयत्न करीन. पक्षाने दिलेल्या संधी बद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार.

error: Content is protected !!