७ मार्चला शरद पवार लोणावळ्यात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
लोणावळा:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार लोणावळ्यात ७ मार्चला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.मागील आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाचे लोणावळा युवक अध्यक्ष पद बदलले.
परिणामी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत सामूहिक राजीनाम्याचे हत्यार उगारले.याच राजकीय घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील पदाधिका-यांनी पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. तालुक्यातील व शहरातील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. गुरुवारी (दि.७ ) सकाळी १० वाजता हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार आहेत. त्यामुळे लोणावळा शहर परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घड्याळ काढून, तुतारी वाजवणार का याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहे.
शरद पवार हे लोणावळा व मावळातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार असल्याची माहिती यशवंत पायगुडे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, विनोद होगले, संतोष कचरे, फिरोज शेख व अन्य मंडळींनी पत्रकार परिषदेत दिली.
यशवंत पायगुडे म्हणाले,” आम्ही पवार साहेब यांच्या सोबत आहोत.शहरातील व तालुक्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते संवाद मेळाव्याला उपस्थित राहतील.
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती
- कडजाई माता क्रिकेट मैदानाची आयोजक प्रशांत भागवत यांच्या कडून पाहणी
- पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी कार्याध्यक्षपदी संगीता शिरसाट यांची निवड