वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायतीतील विकासकामांना मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपल्बध करून दिल्याबद्दल मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.समस्त वडगावकर नागरिकाच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देणारे मावळचे आमदार सुनील शेळके यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी भव्य नागरी सत्कार साहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हभप शंकर महाराज मराठे, हभप तुषार महाराज दळवी, हभप बाळासाहेब काशीद, नितीन महाराज काकडे, हभप भाऊसाहेब टाकळकर उपस्थित होते.सर्वच मान्यवरांनी आमदार सुनिल शेळके यांना शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या कार्यकाळात वडगाव नगरपंचायतीला आमदार सुनिल शेळके यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी देऊन जवळपास ९० टक्के विकासकामे मार्गी लागली आहे.
याव्यतिरिक्त येत्या आठवडाभरात अजून कोट्यावधी रूपयांचा निधी आमदार सुनील शेळके उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती ढोरे यांनी दिली.उर्वरित विकासकामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त करत आमदार शेळके यांचे कौतुक केले.
आमदार सुनिल शेळके यांनी गेल्या पाच वर्षांपासून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्याचे प्रशासकीय शहर असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीचे पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यानंतर शहराचा नियोजनबद्ध विकास होत आहे. वडगाव कातवीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने तसेच वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहे.
वडगाव हे सुनियोजित शहर करण्याच्या दूरदृष्टीने मुख्य रस्त्यासह सर्व प्रभागातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण तसेच डांबरीकरण करणे, हायमास्ट सौर दिवे बसविणे, नगरपंचायत इमारत बांधणे, अग्निशमन वाहन उपलब्ध करणे, विद्युत शवदाहिनी बसविणे, बंदिस्त ड्रेनेज लाईन इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
सर्वांत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली आपल्या वडगाव शहराची ४० कोटींची स्वतंत्र पाणी योजनेला तांत्रिक मंजूरी मिळाली असून पुढील महिन्यात या कामाला देखील प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. तसेच पुढील काळात देखील नागरिकांच्या हिताच्या कामांना निधी कमी पडु देणार नाही असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी उपस्थितांना दिला. यावेळी वडगाव शहरातील सुमारे बारा ते तेरा हजार नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, जेष्ठ नेते अरूण चव्हाण, कुलस्वामिनी महिला मंच मावळ अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, माजी सरपंच बापूसाहेब वाघवले, मा ग्रा पं सदस्य सुनिल चव्हाण, सरपंच नंदाताई ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, रा काॅ वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी सरपंच अर्चना भोकरे, चंदुकाका ढोरे, मा.ता.जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष विष्णू शिंदे, जेष्ठ नेते अशोक ढमाले, अध्यक्ष काँग्रेस आय बाळासाहेब चव्हाण, गोरख ढोरे, भगवान पगडे, बारकू ढोरे, रा. का. जेष्ठ नागरिक सेल शांताराम कुडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, वडगाव काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा हिरे, जेष्ठ नेते मारूती कुडे, रामदास म्हाळसकर, बाळासाहेब कुडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश काजळे, रा. काॅं. युवक अध्यक्ष अतुल वायकर, मा नगरसेवक राहुल ढोरे, पुनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले, दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, मंगेश खैरे, संपत म्हाळसकर, रविंद्र काकडे, युवा नेते सचिन कडू, युवा नेते नितीन चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख प्रविण बा ढोरे, अध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, मा उपसरपंच विशाल वहिले, रा. काॅ. अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, युवा नेते वैभव पिपंळे, राहुल घुले, रविंद्र तुमकर, किरण ओव्हाळ, विकी भोसले, गौतम सोनवणे आणि मोरया प्रतिष्ठानचे क्रियाशील सभासद, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, हितचिंतक मित्रपरिवार, पत्रकार बांधव, व्यापारी बांधव, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वडगाव शहरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अबोली मयूर ढोरे यांनी आभार मानले.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम