वडगाव मावळ :
आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या २५ लक्ष विकासनिधीतून मौजे नाणोली तर्फे चाकण येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिर सभामंडप बांधणे कामाचे भुमिपुजन समारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले
गतवर्षी नाणोली तर्फे चाकण येथे आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला होता त्या नुसार शेळके यांनी विकास निधीतून सभामंडपासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला त्याचे आजग्रामस्थांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले या सभामंडपासाठी माळी समाजोन्नती मंडळाचे रामचंद्र जगताप, दामु जगताप, श्रीपती जगताप, सुलोचना मोईकर यांनी पाच गुंठे जागा उपलब्ध करुन दिली आहे
यावेळी माजी सरपंच रामचंद्र मराठे, माजी उपसरपंच काळुराम मराठे, शहाजी मराठे, मावळ पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सुदेश गिरमे, तळेगाव सोसायटी संचालक एकनाथ भुजबळ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सागर राजगुरु, विद्यमान सरपंच मोनिका शिंदे, उपसरपंच अनिता बोऱ्हाडे, ग्रा.प.सदस्या मनिषा मखामले, सोनल काळे,शुभांगी लोंढे, संतोष मराठे, विवेक शिंदे, निलेश मराठे, गणेश मराठे, प्रा.स्नेहल बाळसराफ, माधवी बोरावके, मा.उपसरपंच कैलास यादव, योगेश माळी, दत्तात्रय शेवकर, दत्तात्रय माळी, किशोर माळी, रोहीत गिरमे, ह.भ.प.शंकर मराठे,बबनराव लोंढे, विष्णु जगताप, विलास जगताप, खंडेराव जगताप, चंद्रकांत मोईकर, सुरेश आल्हाट, दशरथ मखामले, स्वप्निल शिंदे, स्वप्निल भुजबळ, अंकुश शिंदे, तेजस शेवकर, गजानन माळी, रवी माळी, संजय लोणकर, श्री संत सावतामाळी महाराज मित्र मंडळ आणि माळी समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा