वडगाव मावळ:
मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी जाहीर पाठिंबा दिला.रविवार ता.२५ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान करावे असे आवाहन असवले यांनी केले.
असवले यांनी महायुतीला पाठिंबा देणारे पत्र महायुतीच्या उमेदवारांना दिले असून हेच पत्र प्रसिद्धीस दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या महायुतीच्या सहकार पॅनलचे उमेदवार किरण हुलावळे यांच्यासह अमोल केदारी, मारूती असवले, बाळासाहेब कोकाटे, भीमराव पिंगळे, अनिल असवले, भूषण असवले, चंद्रकांत वाघमारे, गणपत असवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
असवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मी श्री. मारुती तुकाराम असवले रा. टाकवे बु!! ता. मावळ जि. पुणे येथील रहिवाशी असुन मावळ तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्था खडकाळेची संचालक मंडळ पंचवार्षीक निकडणुक कार्यक्रम जाहिर झाला असल्यान मि क वर्ग प्रतीनिधी या जागेसाठी उमेदारी अर्ज दाखल केला होता.
परंतु सदर निवडणुकी मध्ये मला माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता .परंतु मला पोचण्यासाठी उशीर झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी माझा उमेदारी अर्ज मागे न घेता मला निवडणुक चिन्ह दिले.
तरी मला निवडणुक लढवायची नाही. माझा महायुतीचे उमेदवार श्री. माणिक मारुतराव गाडे, श्री. किरण दौलतराव हुलावळे व श्री. गणेश मारुती विनोदे, यांना पाठिंबा देत आहे.
तरी माझ्या चिन्हा वर शिक्का न मारता विमाण या चिन्हा वर शिक्का मारुन महायुतीचे उमेदवारांना बहुमताने विजय करावे हि विनंती.
कळावे.
आपला विश्वासु
श्री. मारुती तुकाराम असवले
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!