![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_24-02-23_07-50-00-4517509240963830706901-724x1024.jpg)
शनिवार ला २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन
पिंपरी:
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, काळभोरनगर, चिंचवड येथे शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील, दिनेश औटी, विलास सिंदगीकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
उद्घाटनासह एकूण आठ सत्रांमध्ये संमेलनाचे नियोजन केले असून त्यामध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुकूलता व आव्हाने’ हा परिसंवाद, संगणक साधना गौरव पुरस्कार, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य व मूल्यमापन’ यांवर विशेषज्ञ चर्चा, विचारवेध कविसंमेलन, महाविद्यालय वार्षिक अंक पुरस्कार वितरण आणि समारोप या बाबींचा समावेश आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे समजून घेणे, ही काळाची गरज असून यांवर आधारित असलेले पिंपरी – चिंचवड परिसरातील हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक आणि रसिक यांनी आवर्जून या विनाशुल्क संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी केले आहे.
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा
- स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल
- निरोगी आरोग्यासाठी योगयुक्त जीवन शैली ही काळाची गरज- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_24-02-01_12-05-52-4431074551019576359931-717x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-05-02_22-50-19-3289142141958121638067-682x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_22-09-02_21-12-10-3021313445488148563750-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-08-01_08-46-55-0151077066852029641602-249x300.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-10-18_15-50-04-615349070081857417816-1024x540.jpg)