सकल मराठा समाजाकडून मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्यावर  रास्ता रोको
कार्ला:
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सगेसोयरे यांना कुणबी दाखले  मिळवे यासठी बेमुदत उपोषण सुरु केले असून  त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात रस्ता रोका आंदोलन करण्यास सांगितल्याप्रमाणे आज मावळ तालुका सकल मराठा समाजाकडून कार्ला फाट्यावर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर सकाळी ११ वाजता रस्ता रोका आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाज मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाला होता.
या रस्ता रोकोमुळे मुंबई-पुणे महामार्गावर चार ते पाच  किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
     मराठा समाजाला शिक्षण व नोकरी
मध्ये १० टक्के आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशनात केला असला तरी सकल मराठा समाजाची मूळ मागणी असलेल्या सगे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा मंजूर करत मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी आज लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक व   लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनावेळी कुठल्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Content is protected !!