रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वाचकमंच मेळावा
पिंपरी:
भारतीय स्त्री शक्ती जागरण, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ठीक ३:३० ते ५:३० या कालावधीत भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे वाचकमंच मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे हे दुसरे वर्ष आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे ‘कथा पुस्तक जन्माची’ या विषयावर प्रकाशन क्षेत्रातील आपले रंजक अनुभव खुसखुशीत शैलीत मांडणार आहेत. तसेच भारूड सादरीकरण आणि सदस्यांचे मनोगत याचा श्रवणानंद मिळणार आहे.
विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!