शिवजयंती निमित्त कार्ल्यात स्पर्धा परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थांंचा  गौरव
कार्ला-
एम एच  करियर अॕकडमी कार्ला यांच्यावतिने शिवजयंतीचे औचित्य साधत  नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध  स्पर्धा परीक्षा या मध्ये रेल्वेभरती,लेखपाल,पोलिस भरती,पायलट आशा विविध स्पर्धत यशस्वी झालेल्या गुणवंताचा सन्मान तसेच शिव व्याख्याते सतीश साठे यांचे शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
शिवजयंती निमित्त एम एच अॕकडमी  संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थींनींने कोराईगड  किल्यावरुन शिवज्योत घेऊन आले व स्वच्छता अभियान राबवले.
सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरवात झाली.
स्पर्धा परीक्षेतील  सत्कार मूर्ती गुणवंत विद्यार्थी  विशाल  हरिहर (वन परिक्षेत्र अधिकारी (राजपत्रित), सुशील नाईकनवरे (रेल्वे पोलीस), आवांती मोहिते ( पोलीस शिपाई),प्रतीक त्रिंबके (पोलीस शिपाई), हेमंत भालेकर (loco पायलट), सचिन लोखंडे ( वरिष्ठ सहाय्यक लेखापाल) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सभापती शरद  हुलावळे ,सरपंच कार्ला दिपाली  हुलावळे,ग्रा सदस्य  सचिन  हुलावळे,सदस्या वर्षा हुलावळे,सोनाली मोरे,आदर्श शिक्षक संतोष  हुलावळे, उमेश इंगुळकर यांंच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थापक मितेश हुलावळे,सुत्रसंचालन श्रुती भगत भक्ती हुलावळे तर आभार विजय जंगम यांनी मानले.

error: Content is protected !!