वडगाव मावळ:
ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे.युनियनने वडगाव मावऱचे पोलीस निरीक्षक यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली.
मावळ तालुक्यातील कुसवलीचे ग्रामसेवक अतुल रावते यांना झालेल्या मारहाणीबाबत कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
ग्रामसेवक अतुल रावते हे ग्रामपंचायत कुसवली येथे आपले नियमित कामकाज करित असताना त्यांच्यावर मनात राग ठेऊन व कट रचुन ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ दशरथ भालेराव यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन अतुल रावते यांना मारहाण केली .
व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे शासकीय कर्मचारी हे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत असताना त्यांच्यावर गावातील व तेही ग्रामपंचायत सदस्यां सारख्या जबाबदार व्यक्तिने अशा प्रकारे शासकीय कर्मचा-बाला जीवे मारण्याचा प्रयत्र करणे म्हणजे कायद्याची भिती नसणे असा होतो.
अशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवकांना होत असलेल्या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार झालेले आहे. अशा प्रकारे शासकीय कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला करणा-या व्यक्तींना तात्काळ अटक होऊन कारवाई झाली पाहिजे.
तरी आपणास पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन शाखा मावळ मार्फत मागणी करणेत येते की श्री अतुल रावते ग्रामसेवक यांचेवर ग्रामपंचायत सदस्य श्री सिद्धार्थ भालेराव यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत त्यांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर योग्य ती फौजदारी स्वरुपाची कारवाई होणेबाबत आपलेकडून तात्काळ अटक होणेसाठी पोलिस प्रशासनाकडून दखल घेणेत यावी.
सदर व्यक्तिला अटक न झालेस त्याचे परावर्तन मोर्चामध्ये होईल, तरी आपणास विनंती आहे की सदर व्यक्तिवर कारवाई करावे असे या निवेदनात म्हटले आहे.