तळेगाव स्टेशन:
मावळ तालुक्याला व तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे.तसा कला व सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा  जतन करणा-या कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व रसिकांच्या सोयीसाठी नाटयगृह उभे करू अशी ग्वाही  मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिले.
येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे यांच्या आयोजित केलेल्या शंभराव्या नाटय संमेलनाच्या सांगता सोहळ्यात आमदार शेळके बोलत होते.तत्पूर्वी शहरांतून दिंडी काढण्यात आली.आमदार सुनिल शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रायोजक स्वीकारले होते. नांदी व  गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नटराज पुजन व दीपप्रज्वलन आले.
अखिल भारतीय नाटय परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, खासदार श्रीरंग बारणे, पुणे पीपल्स बँकचे संचालक  बबनराव भेगडे, नाटय परिषदचे सुरेश साखवळकर,गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे,,अभिनेते माधवराव अभ्यंकर,अभिनेते  अजित भुरे
राजन भिसे,अभिनेत्री सविता मालपेकर, कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सारीका शेळके उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले ”  पुणे जिल्ह्याची कलात्मक गंगोत्री तळेगाव दाभाडे आहे. तळेगाव नाटय संमेलन तळेगाव व्हावे. विकासाची वाटचाल महत्वाची आहे.तशी शहरातील कलाकार,खेळ्डू यांनाही  जपा.प्रास्ताविकातून सुरेश धोत्रे यांनी शहरात  नाटयगृह उभारावे  अशी मागणी केली. राजेश बारणे यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!