तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली.
बापूसाहेब भेगडे यांना मानणारा मोठा वर्ग मावळ तालुक्यात आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, संत तुकाराम  सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी त्यांची राजकीय वाटचाल राहीली आहे.ते विविध सामाजिक संस्थांशी निगडित आहे.मावळ विधानसभेची निवडणूक त्यांनी यापूर्वी लढवली होती.प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!