श्रेयस दर्डे,आदेश फलके,रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
कामशेत:
       पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ५१व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये तीन दिवस घेण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील १४० प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती.
यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रकल्पांची निवड करण्यात आली त्या विद्यार्थांंचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
माध्यमिक व उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांंना पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे,गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, वैज्ञानिक अंकिता नगरकर, मुख्याध्यापक संघ जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड,मावळ तालुका मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, उपशिक्षणाअधिकारी निलेश धानापुणे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमिन, डायट अधिव्याख्याता नलावडे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर चटणे, मावळ  शिक्षण  विस्तार अधिकारी शोभा वहिले, तुलसानी कॉलेज च्या प्राचार्या श्रध्दा चव्हाण,, विज्ञान संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार यांंच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश गायकवाड यां .नी केले. सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे यांनी केले तर आभार शोभा वाहिले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख व समग्र शिक्षा अभियान सर्व विषय साधन व्यक्तीयांनी मोलाचे सहकार्य केले .
निकाल पुढीलप्रमाणे :-
राज्य स्तर निवड  गट : ९ वी ते १२वी   प्रथम :श्रेयस दर्डे, द्वितीय : अमिशा कुलकर्णी, तृतीय ज्ञानेश्वरी हरगुडे,
आदिवासी विभाग- प्रथम :आदेश गणेश
फलके, द्वितीय :राजवीनी हांडे
दिव्यांग गट –
प्रथम रुशील मिलिंद पटाडीया, द्वितीय
राधिका दत्तात्रय कलाल,
गट ६ वी ते ८ वी  : प्रथम कु धनश्री सुर्यकांत मुंढे द्वितीय मयुरी सुभाष काकडे, तृतीय  प्रीती उमेश लांडगे
आदिवासी गट:
प्रथम क्रमांक -सिद्धार्थ राजेंद्र राउत द्वितीय ईश्वरी कोकणे
दिव्यांग गट- प्रथम  ओम बाजारे, द्वितीय प्रणव सतीश हरपळे
प्राथमिक शिक्षक गट :  एस पी खैरमोडे
द्वितीय नदाब हुसेन मेहबुब,
माध्यमिक शिक्षक गट : प्रथम कमांक- अरुंधती सुहास अंबिके,द्वितीय अनिल मारवीन स्कॉट परिचर गट – सचिन रामदास सोंडकर,द्वितीय दादासाहेब दिनकर पिंगळे.

error: Content is protected !!