तप पूर्तिचा क्षण आला!अवघा चैतन्य परिसर राममय झाला!!
इंदोरी:
तप पूर्तिचा क्षण आला।अवघा चैतन्य परिसर राममय झाला!!याची अनुभुती चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनेशनल स्कूलच्या (CBSE)वार्षिकोत्सव सोहळ्यात आली.हा तपपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साज़रा करण्यात आला.
अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून शाळेचा संपूर्ण परिसर राममय आणि भक्तिमय झाला होता.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश कृष्णाजी साखवळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभु श्री रामाच्या चरणी स्वहस्ते एक एक दीप प्रज्वलित करून आस्था व्यक्त केली.सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुआत गणेश स्तुती वर आधारित नृत्य प्रस्तुतीने झाली. सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली साखवळकर म्हणाले,” ग्रामीण भागात असलेली, CBSE बोर्ड ची आणि सर्व विभागात सुसज्ज असलेली ही मावळ तालुक्यातील एकमेव शाळा आहे.या शाळेचे भवितव्य खूप उज्वल आहे. भविष्यात या शाळेचे रूपांतरण एका मोठ्या रहिवासी कॉलेज मध्ये होईल. मावळच नव्हे तर परदेशातून देखील मुले येथे प्रवेश घेतील.
या संस्थेचे विशेष कौतुक म्हणजे डोनेशन न घेऊन देखील इतक्या उत्कृष्ट पणे चालणारी ही एकमेव शाळा आहे. त्यामागे संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांचे नीतिमूल्य आणि श्री गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद आहे.
कार्यक्रमात विविध प्रकारचे नृत्याविष्कार पहायला मिळाले.
आई भवानीचा गोंधळ, शिवाजी महाराजांची वीर गाथा, चिमुकल्यांची गोड़ आणि निरागस नृत्य प्रस्तुति तर मोठ्या मुलांची समाजाला संदेश देणारी एक नृत्य नाटिका झाली.
प्रत्येक प्रस्तुतीला दर्शकांचा जल्लद प्रतिसाद मिळाला.
पोल आणि रोप मल्लखांबची संतुलित आणि अनुशासित प्रस्तुती भावली.
हनुमान चालीसा गण्यावर छोट्या छोट्या हनुमानांनी नृत्य प्रस्तुत करून सर्वांना आकर्षित केले.कार्यक्रमाचे मुख्याकर्षण श्रीरामा चे आगमन होते. लंका विजय नंतर अयोध्येत परत येऊन रामाचे राज्याभिषेक पर्यतचे देखावे दाखवण्यात आले. शबरी राम मिलन आणि राम भरत मिलाप हे दोन्ही देखावे दाखवण्यात आले.
श्रीराम राज्याभिषेकानंतर रामाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.सामूहिक आरती नंतर महाप्रसाद घेण्यात आला. उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम संपन्न झाला.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!