तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील शेतीपुरक व्यवसाय करणा-या शेतकरी बांधवाना एच.डी. एफ सी.बँक प्राधान्याने कर्जपुरवठा करेल अशी ग्वाही बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सद्दाम सय्यद यांनी वडगाव मावळ येथे केले.
     मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटना आणी एच.डी.एफ.सी.बँक यांचे  संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  कर्ज मेळाव्यात श्री सय्यद हे बोलत होते.मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे हे होते.
यावेळी उद्योजक संपत पवार,पोल्ट्री संघटनेचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी,कार्याध्यक्ष ससुभाष केदारी,सचिव प्रविण शिंदे,सहसचिव महेश कुडले,खजिनदार विनायक बंधाले,संभाजी शिंदे,सोमनाथ राक्षे,संतोष घारे,बाबाजी पाठारे, पंढरीनाथ खरमारे,अ‍ॅड चंद्रकांत खांदवे व पोल्ट्री उद्योजक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  शेतीपुरक कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय,शेळीपालन,फुलशेती आदी व्यवसायास कर्जपुरवठा कोणत्या प्रकारने केला जातो,या बाबतची सर्व माहिती वरिष्ठ अधिकारी सय्यद यांनी यावेळी सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले तर अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी पोल्ट्री उद्योजकांनी बॅंकेच्या कर्जाचा वापर करून स्वतःच्या व्यवसायाची प्रगती  करून घ्यावी असे आवाहन केले.तर कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!