वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील कांब्रे येथील दोन तरूणांनी सायकल वरून अष्टविनायक यात्रा पूर्ण केले.आरोग्य साठी सायकल चालवा हा संदेश देत ही सायकल यात्रा पूर्ण झाली.
श्री अष्टविनायक दर्शन सायकल चालवत या दोघांनी दोन दिवसात ६०१ किमी अंतर पार केले.
कांब्रे गावातील गणेश गायकवाड आणि त्याचा सहकारी सूरज जाट या दोघांनी  शनिवारी १३ जानेवारी २०२४ रोजी तळेगाव पासून थेऊर चिंतामणी गणपती असा प्रवास सुरू केला नंतर मोरगावचा  मोरेश्वर  गणपती, सिध्दीटेक  सिद्धिविनायक     गणपती,रांजणगावचा महागणपती,त्यानंतर ओझेर  गणपती,महड,पाली असे अष्टविनायक यात्रा सायकलवर दोन दिवसात पूर्ण केली एकूण ६०१ km असा प्रवास करून त्यांनी समाजाला संदेश दिला की सायकल चालवताना आपले शरीर हे निरोगी राहते आपल्या हृदयाच्या मास पेशीची पातळी वाढते म्हणजे फुसाची पातळी वाढते आणि आपला स्ट्यामीना वाढतो.आपल्या शरीरातील रक्त भिसरण चांगले होते असे खूप फायदे आहेत.

error: Content is protected !!