कामशेत येथे  जिल्हास्तरीय  विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन
जिल्ह्यातील नवसंशोधक विद्यार्थांंनी १८० प्रकल्प केले साद
कामशेत :
पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये भरविण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण उपसंचालक  राजेंद्र आहिरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांंच्या हस्ते करण्यात आले.
   गुरवार दि. १८,शुक्रवार  १९ व शनिवार २० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन असणार असून पुणे  जिल्यातील १३ तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेला प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत.
यावर्षी प्रथमच दिव्यांग व आदिवासी गटातून प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
या प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील २४० शाळेतील  ३५०  विद्यार्थी व ४८ परिचर व विज्ञान शिक्षकांनी १८० प्रकल्प सादर केले आहेत.
यावेळी उपशिक्षणाधिकरी अनंत दाणी, छाया महिंद्रकर, निलेश धानापुणे, प्रणिता कुमावत, गटशिक्षणाधिकारी मावळ सुदाम वाळुंज, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, उपाध्यक्ष  राजेश गायकवाड,विस्तार अधिकारी सुधीर चटणे , तुलसानी काॕलेज प्राचार्या श्रध्दा चव्हाण,शोभा वहिले,तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, जिल्हा अध्यक्ष रोहिदास एकाड, तालुका अध्यक्ष सुरेश सुतार,अभिमन्यु शिंदे यांंच्यासह जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी उपस्थीत होते.
तसेच यावेळी जिल्हा गुणवत्ता स्तर निश्चिती प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ शाळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचालन मुकुंद तनपुरे,ज्योती लावरे तर आभार गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मानले.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे  व मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मावळ तालुक्यासह जिल्ह्यातील  विज्ञान प्रेमी विद्यार्थांंनी,शिक्षकानी तसेच पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला उपस्थीत राहावे व प्रकल्प पाहण्यासाठी यावे असे  आहवान केले आहे.

error: Content is protected !!