तळेगाव दाभाडे नगरपरिषद  उपमुख्याधिकारी ममता राठोड व महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा काळे यांची नवीन समर्थ विद्यालयाला भेट
तळेगाव स्टेशन:
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे   यांच्या समवेत ममता राठोड मॅडम व  सुवर्णा काळे यांनी नवीन समर्थ विद्यालयास सदिच्छा भेट दिली. नवीन समर्थ विद्यालयातील अण्णा विजापूरकरांना त्यांनी अभिवादन केले.  सर्व इतिहास सौ प्रभा काळे  यांनी सांगितला.
  इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राठोड व काळे यांनी  मार्गदर्शन केले.
    ममता राठोड  म्हणाल्या,” या परीक्षा देताना सराव फार महत्त्वाचा आणि गरजेचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट असे सांगून त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
     याप्रसंगी नवीन समर्थ विद्यालयाच्या प्राचार्य  वासंती काळोखे  यांनी ममता राठोड व सुवर्णा काळे यांचे स्वागत सत्कार करून आभारही मानले. विद्यालयाचे पर्यवेक्षक रेवप्पा शितोळे उपस्थित होते.

error: Content is protected !!