अपयशाला घाबरू नका प्रयत्नशिल रहा -सानिका काजळे
युवादिना निमित्त सानिका काजळेंचा एकविरा विद्यालयात सन्मान
कार्ला:
अपयश हे काही क्षणासाठी असून अपयश आले म्हणून घाबरू नका शक्यतो सोशलमिडीयाचा वापर कमी करुन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा.आपल्या आई वडिलांचे आपल्या गुरुचे नाव आपल्या कृतीतुन मोठे करा असे उदगार मुंबई पोलिस दलात  नवनियुक्त झालेल्या महिला पोलिस  कु सानिका मारुती काजळे यांनी कार्ला येथील मुलांना मार्गदर्शन करताना काढले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता काॕलेज कार्ला येथे राजमाता जिजाऊ माॕ साहेब व  विचारवंत स्वामी विवेकानंद यांंच्या जयंंतीचे औचित्य साधत कार्यक्रम  घेण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
      या कार्यक्रमाचे औचित्य साधत सानिका काजळे यांंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्राचार्य संजय वंजारे,सामाजिक कार्यक्रते अनंता आगळमे,जेष्ठ अध्यापिका रेखा भेगडे,शिक्षक प्रतिनिधी उमेश इंगुळकर,मच्छिंद्र बारवकर,संजय हुलावळे,विवेक भगत,सचिन हुलावळे,अनिल चौधरी,अरुणा बुळे,छाया सोनवणे,संगीता खराडे,काजल गायकवाड ,रंजना नवाळे,सची दगडे,शिल्पा वर्तक,रोहित ढोरे,बाबाजी हुलावळे,उल्हास हुलावळे,रोहिदास वाघवले यावेळी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय हुलावळे यांनी सुत्रसंचालन उमेश इंगुळकर तर आभार प्राचार्य संजय वंजारे यांनी मानले.

error: Content is protected !!