
टाकवे बुद्रुक:
येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे
बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन स्कूल चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चिंधू असवले आणि स्कूल चे प्रिंसिपल राज कांबळे यांनी केले.
या प्रसंगी स्कूल च्या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती.इयत्ता चौथी ते दहावी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी इंग्रजी ,मराठी व हिंदी मधून भाषणे दिली.
कांचन जाचक आणि ऐश्वर्या मालपोटे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच अविनाश जाधव सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले व स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार पटवून दिले.
पूजा कालेकर ,रुपाली जाधव , नेहा असवले , स्नेहा जगताप आणि अमिता जोशी यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पहिली.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार




