वडगाव मावळ:
महाराष्ट् राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेची राज्यस्तरीय बैठक नगर येथे नुकतीच संपन्न झाली. यासभेस 32जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
ही सभा राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस संघटनेचे सचिव विलास साळवी, खजिनदार प्रकाश लसणे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले शरद गोडांबे, राज्य संघटक सोनबा गोपाळेगुरूजी, बाबासाहेब देशमुख उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी, दिपक पाटील सुभाष केदारी, तालुकाध्यक्ष एकनाथ गाडे सचिन आवटे, महेश कुडले रविंद्र खराडे रमेश जयदेव यांचेसह 32 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपल्या न्याय हक्कासाठी सर्व पोल्ट्री योद्ध्यानी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष अनिल खामकरसाहेब यांनी केले. यावेळी सर्व वक्त्यानी संघटना बांधणी बाबत मार्गदर्शन केले.
कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले यांनी सभेचे आयोजन केले होते.सभेनंतर मराठवाडा आणी विदर्भ येथील पोल्ट्री शेतकर्याच्या सभा घेण्यासाठी पदाधिकारी रवाना झाले.
- मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
- सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय
- रविवार,०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
- महर्षी कर्वे आश्रम शाळेचे सोळावे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
- मावळात आज पासून किर्तन महोत्सव : आमदार सुनिल शेळके व विठ्ठल परिवाराचा पुढाकार