कार्ला:
मावळच्या वेहरगाव येथील कन्येने परदेशात गगन भरारी घेतली आहे.तिच्या या यशाचा मावळ करांना अभिमान आहे.
आर्या जितेंद्र बोत्रे असे या मावळ कन्येचे नाव आहे.तिने युके इंग्लंडच्या मँचेस्टर युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स ॲाफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी ॲन्ड इंटरपायजेस ही पदवी घेतली.
या डिग्रीचे शिक्षण तिने मेरिट लिस्ट मध्ये येऊन पूर्ण केले.तिचा पदवी समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न झाला.या सोहळ्यात युनिव्हर्सिटीचे प्रमुख,गुरुजन,विद्यार्थी उपस्थित होते.आर्याची आई सायली बोत्रे,वडील जितेंद्र बोत्रे आणि बहिणीने याच डोळा याच देही हा पदवी ग्रहण सोहळा अनुभवला.आणि आनंदाने त्यांचे डोळे पाणावले.
आर्याचे शिक्षण लोणावळा येथील रायगड इंटरनॅशनल शाळेत झाले.शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांमध्ये ती सहभाग असायची. शालेय जीवनात तिच्या नेतृत्व गुणांची जडणघडण झाली. विद्यार्थ्यांमधून मतदान प्रक्रियेच्या निवडीतून ती शालेय कॅप्टन झाली होती.
विद्यार्थ्यांकरिता तिने खूप चांगलं कार्य केले.शालेय गॅदरिंग मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक नाट्य प्रयोग करण्यात आला होता .त्यावेळी तिने जिजाऊची भूमिका खूप सुंदर पद्धतीने साकार केल्याचे लोणावळ्याकरांनी बघितलेच आहे.
पुढील शिक्षण तिने पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर युके येथील युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशासाठी तिने एप्लीकेशन केले होते.अभिमानाची गोष्ट म्हणजे तिने सात कॉलेजची निवड केली होती.सातही कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता. नामांकित मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्याचा तिने निर्णय घेतला.
अभ्यासामध्ये तिने स्वतःला झोकुन घेऊन खूप मेहनत करून तिने ही डिग्री मेरीट लिस्ट मधुन संपादन केल्याचे आई-वडिल नातेवाईक व आपल्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांन मध्ये अभिमान व आनंद आहे. मेरिट लिस्ट मध्ये आल्याने इंग्लंड मध्ये अनेक नोकरीच्या संधी झाल्या आहेत.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित