वडगाव मावळ:
साते ता.मावळ येथील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२४  वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आला.
संस्थेच्या कार्यालयात हा प्रकाशन सोहळा झाला. संस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे,सीईओ वदन आगळमे, संचालक  रामदास आगळमे, सिध्दार्थ मोरे ,रविंद्र बुरकुले ,राजू आगळमे , संकल्प संस्थेचे खजिनदार नितीन आगळमे , व्यवस्थापक समीर आगळमे उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक मारुती आगळमे  यांनी १४ डिसेंबर
२०१४ला स्थानिक तरुणांना घेऊन मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेली पतसंस्था स्थापन केली. संस्था पत पुरवठा बरोबर सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देत असते
ग्रामीण भागात सहकाराचे जाळे अधिक विस्तारले आहे.सहकारातून समृद्धी साधण्यासाठी पतसंस्थेकडून कर्ज पुरवठा केला जातो. शेतीपूरक व्यवसायासह अन्य व्यवसायासाठी अनेकांनी कर्ज घेतले आहे.यातून उभे राहिलेल्या व्यवसायातून नवी पिढी व्यवसायात उभी राहत असल्याचे पहायला मिळतंय.

error: Content is protected !!