संकल्प प्रतिष्ठानची भाऊबीज उत्साहात
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भाऊबीजेच्या निमित्त प्रभाग क्र १७ मधील स्वच्छता कर्मचारी असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ३३ महिलांनी प्रतिष्ठानच्या सभासदांना औक्षण केले.प्रतिष्ठानच्या वतीने सर्व महिला भगिंनीना भाऊबीजेला साडी आणि सोबत साखर वाटप करण्यात आली.
सर्वांना चहा पाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली.डॉ. सुशिल मुथियान,ब प्रभाग आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, जेष्ठ सभासद सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मेरुकर, रमेश सरदेसाई यांच्या हस्ते वाटप केले.
प्रास्तविक डॉ.मोहन गायकवाड यांनी केले.डॉ सुशिल मुथियान यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.संस्कार प्रतिष्ठान नेहमीच प्रत्येक थरातील नागरिकांसोबत सलोख्याचे नाते तयार करते.या निमित्त हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आरोग्य अधिकारी महादेव शिंदे म्हणाले,” आजकाल भाऊबीज साजरी करायला सुध्या लोकांना वेळ मिळत नाही. आमच्या महिलांना एक बहिण म्हणून प्रतिष्ठानने चांगला मान दिला.संस्कार प्रतिष्ठान नेहमी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असते.
कल्पना तळेकर यांनी आभार मानले.शब्बीर मुजावर,गोविंद चितोडकर, सायली सुर्वे ,वसंत दळवी, संध्या स्वामी ,सुनिता गायकवाड, इशिता गायकवाड, भरत शिंदे ,मिनाक्षी मेरुकर उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस