टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील कोंडिवडे ग्रामपंचायतींच्या सदस्या पुष्पलता योगेश कडू यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला.विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्रक,सन्मानचिन्ह,तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
तर सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल सन्मान पत्रक आणि शालोपयोगी वस्तु देण्यात आली.स्वराज्याचा इतिहासाची विद्यार्थांना आवड वाढावी हा या मागचा उद्देश असलयाचे योगेश कडू व पुष्पलता कडू यांनी सांगितले.
पहिला क्रमांक- जिवलग ग्रुप सार्थक कडू,जीवन तळावडे,दुसरा क्रमांक – गणेश कडू,तिसरा क्रमांक -खुशी लामगण,चौथा क्रमांक -दर्शना तलावडे,पाचवा क्रमांक- श्लोक खापे यांने पटकाविला.
सदस्य पुष्पलता कडू,माजी सरपंच संभाजी कडू ,माजी सरपंच राधा मुंढारकर,माजी उपसरपंच भगवान शिंदे,ग्रा स.अजित कडू, ग्रा.स .दीपक कडू तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष