टाकवे बुद्रुक:
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.ग्रामीण भागातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची बातमी मावळ सत्य डिजिटल पेज व मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन वर सर्वात प्रथम प्रसिद्ध करण्यात आली होती.
तसेच आंदर मावळात वडेश्वर,खांडी, माळेगांव, कशाळ विविध कार्यकारी सहकारी संस्था परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्या बाबत वडेश्वर संस्थेचे अध्यक्ष नारायण ठाकर यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. आमदार सुनिल शेळके यांना अवकाळी पावसामुळे झालेला नुकसानीचा अहवाल देण्यात आला होता.
माजी उपसभापती शांताराम कदम यांनीही या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.परिस्थितीची दखल घेऊन दिपावली सुट्टी असताना देखील तहसीलदार विक्रम देशमुख यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची करण्यासाठी प्रशासकिय अधिकारी, कृषी अधिकारी यांना पाठविले होते.
वडेश्वर खांडी परिसरात पाहणी करण्यात आली नुसकानग्रस्त शेतकरी बांधवांनी नुसकानग्रस्त भात क्षेत्राचे फोटो काढून पंचनामे अहवाल सादर करण्याची संबंधित सुचना अधिकारी यांनी केली, वडेश्वर परिसरात पाहणी करताना अध्यक्ष नारायण ठाकर,उपाध्यक्ष महादु कशाळे व संचालक मंडळ आणि प्रशासकिय अधिकारी वडेश्वर, खांड कामगार तलाठी एस एम थोरात , कृषी अधिकारी घनश्याम दरेकर.यांच्या उपस्थितीत भात पिकाची नुसकान पाहाण्यात आली.
सबंधीत अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुसकान भरपाई देण्याबाबत संबंधित विमा कंपनी व प्रशासनाला अहवाल सादर करावा व भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी ठाकर यांनी केली.