पवनानगर:
मावळ तालुक्यातील गुलाबाला जगभरात मागणी आहे.तर मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदूळ महाराष्ट्र भर पोहचला आहे.या सुवासिक इंद्रायणी च्या भाताला योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.यंदाच्या हंगामात इंद्रायणी भाताला काय भाव मिळणार याकडे बळीराजाचे लक्ष आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मंगळवार ता.१४ ला पवनानगर येथे भात खरेदीचा शुभारंभ होणार आहे.मावळचे आमदार सुनील शेळके,आमदार संजय जगताप,
जिल्हा बॅकेचे अध्यक्ष,बॅकचे संचालक माऊली दाभाडे ,संचालक रेवणनाथ दारवटकर यांच्या उपस्थितीत भात खरेदीचा शुभारंभ होत आहे.
माझ्या बळीराजाला दोन पैसे जास्त मिळावेत अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली आहे.उद्याच्या शुभारंभ प्रसंगी भाताला काय भाव मिळतोय याकडे सर्वाचे लक्ष आहे.मावळाला भाताचे आगार म्हणून ओळखले जात आहे.कोळंबा,चिमणसाळ,रत्ना,फुले समृद्धी या वाणाची लागवड जरी मावळात होत असली तरी बाजारात मागणी असलेल्या इंद्रायणी भाताची लागवड सर्वाधिक होत आहे.
चारसुत्री आणि यांत्रिकीकरणाने भात लावणी होते.तशी भात कापणी आणि झोडपणीची कामे आता यांत्रिकीकरणाने होत आहे.
उत्पादित भाताला तातडीने बाजारपेठ मिळावी यासाठी बारा केन्द्रावर भात खरेदी केली जाणार आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी किती रूपयांची वाढ होणार याकडे शेतक-यांचे लक्ष आहे.खाजगी खरेदीदार व्यापा-यांना मावळातील सहकार क्षेत्राने स्पर्धा केली आहे.या स्पर्धेत शेतक-यांचा अधिक लाभ व्हावा यासाठी आमदार सुनिल शेळके भाताला काय दर देण्याची घोषणा करणार याकडे शेतक-यांचे लक्ष आहे.