टाकवे बुद्रुक:
येथील माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांनी समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून वाढदिवस केला साजरा.
रोहिदास असवले यांनी आपला वाढदिवस साजरा करताना  आपण या समाजाचे काही देणे लागत आहोत, या भावना बाळगल्या आणि याच  अनुषंगाने त्यांनी आंदर मावळ मधील काही भागांमध्ये कातकरी व ठाकरवस्तीवरील माता-भगिनींना साडी वाटपाचा  उपक्रम राबविला.  या कार्यक्रमांमध्ये कातकरी व ठाकर  समाजातील अनेक माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
तसेच कुसवली येथील सहारा वृद्ध आश्रम या वृद्धाश्रमासाठी त्यांनी दोन महिने पुरेल असे किराणा  साहित्य त्या ठिकाणी दिले. तसेच तेथील माता-भगिनींना देखील साडी वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. दरम्यान यावेळी येथील  वृद्धआश्रम संस्थापक विजय जगताप  यांनी माजी उपसरपंच रोहिदास असवले यांचे  दोन महिन्याचे पुरेल एवढे रेशन दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.  वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  आंदर मावळ मधील वडेश्वर व माळेगाव खुर्द येथील आश्रम शाळेमध्ये दिवाळीनिमित्त  वाढदिवसाच्या औचित्य साधून  खाऊ वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. दीपावलीच्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थी आपआपल्या गावी गेले असल्याकारणाने खाऊ वाटपासाठी तेथे असणाऱ्या शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात आली.विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत रुजू झाल्यानंतर शिक्षकांकडून तो खाऊ त्या मुलांना देण्यात येणार आहे.
माजी उपसरपंच असवले यांनी सर्व कातकरी ठाकर समाजातील बंधू भगिनी, आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी  दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी  कातकरी  व ठाकरवस्ती पाड्यावरील नागरिकांनी रोहिदास असवले यांचा व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व  सहकाऱ्यांचा सत्कार केला.

error: Content is protected !!