तळेगाव दाभाडे:
येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात रविवार पहाटेपासून काकड आरती महोत्सव अतिशय उत्साहाने आणी भक्ति भावाने सुरू झालेला असुन या कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती लाभली आहे.
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात काकड आरतीची शेकडो वर्षाची परंपरा असुन भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास भक्तिभावाने उपस्थिती दाखवत असतात.
पहाटे पांडुरंगास अभिषेक पुजा काकड आरती भजन आदी धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात. काकड आरती महोत्सवाचा शुभारंभ पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष व उद्योजक शिवाजीराव उत्तम भेगडे व त्यांच्या पत्नी अरुणा भेगडे यांचे हस्ते करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे (माऊली) , यतिनभाई शहा ,किरण गवारे, अतुल देशपांडे आणी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर यांनी केले होते.